राजस्थानात केवळ २२ टक्के हरभरा-मोहरी हमीभावाने खरेदी होणार
13 March 08:30

राजस्थानात केवळ २२ टक्के हरभरा-मोहरी हमीभावाने खरेदी होणार


राजस्थानात केवळ २२ टक्के हरभरा-मोहरी हमीभावाने खरेदी होणार

कृषिकिंग, जयपूर: राजस्थानातील अशोक गहलोत सरकारने चालू रब्बी हंगामात किमान आधारभूत किमतीने ८.५० लाख टन मोहरी आणि ४.१७ लाख टन हरभरा खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. अशी माहिती राजस्थानचे सहकारमंत्री उदयलाल आजंना यांनी दिली आहे. मात्र, राजस्थान सरकारने निर्धारित केलेले हे लक्ष्य एकूण उत्पादनाच्या २२ टक्के इतकेच आहे. त्यामुळे राजस्थानातील शेतकऱ्यांना जवळपास ७८ टक्के हरभरा व मोहरी हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागणार आहे.

राजस्थान सरकारच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, २०१८-१९ च्या रब्बी हंगामात राज्यात ३५.८८ लाख टन मोहरी, आणि २१.६३ लाख टन हरभरा उत्पादित होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या रब्बी हंगामात अनुक्रमे ३४.०१ लाख टन आणि १६.७९ लाख टन इतके नोंदवले गेले होते. मागील वर्षी राजस्थान सरकारकडून ४.७१ लाख टन मोहरी आणि ५.७९ लाख हरभऱ्याची खरेदी करण्यात आली होती.टॅग्स

संबंधित बातम्या