पाकिस्तानला टोमॅटो पुरवठा सुरु; दररोज पाठवला जातोय १२ ते १५ ट्रक माल
12 March 16:43

पाकिस्तानला टोमॅटो पुरवठा सुरु; दररोज पाठवला जातोय १२ ते १५ ट्रक माल


पाकिस्तानला टोमॅटो पुरवठा सुरु; दररोज पाठवला जातोय १२ ते १५ ट्रक माल

कृषिकिंग, नवी दिल्ली: पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत व्यापारिक संबंध कडक केले होते. अनेक वस्तूंवरील निर्यात कस्टम ड्युटी २०० टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यामुळे दोन्ही देशातील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र, श्रीनगर येथून पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या चकोटी भागातून ट्रकांची ये-जा सुरु झाली आहे.

रावळपिंडी आणि लाहोरच्या बाजारामध्ये भारतीय भाजीपाल्याचे ट्रक जात आहे. मात्र, हा नेहमीच व्यापार मार्ग नसल्याने भारतीय व्यापाऱ्यांना वाहतूक महागात पडत आहे. सध्या श्रीनगर-मुजफ्फराबाद मार्गाने मालवाहतूक सुरु आहे. जिचा माल पोहचवण्यासाठीचा खर्च अटारी सीमेच्या तुलनेत ४ पट्टींनी अधिक येत आहे.

पाकिस्तानला टोमॅटो पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, "दोन्ही देशांतील तणाव थोड्या फार प्रमाणात निवळ्यानंतर आता भाजीपाला वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. दररोज १२ ते १५ ट्रक माल पाकिस्तानात पाठवला जात आहे. दरम्यान, सर्वसाधारण कालावधीत भारतातून पाकिस्तानात दररोज ७५ ते १०० ट्रक भाजीपाला पाठवला जातो."

या व्यापाऱ्यांनी अटारी-वाघा बॉर्डरवरून भाजीपाला निर्यात सुरु करण्यासाठी सरकारशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. यासाठी या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पुन्हा निर्यात सुरु करण्यास अनुमती द्यावी, असे म्हटले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या