कालिया योजनेचा निधी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- ओडिसा सरकार
12 March 15:51

कालिया योजनेचा निधी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- ओडिसा सरकार


कालिया योजनेचा निधी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- ओडिसा सरकार

कृषिकिंग, भुवनेश्वर: "ओडिसा सरकार कालिया योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत आर्थिक मदत जमा करणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेपासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत मदत जमा केला जाणार आहे." अशी माहिती ओडिसाचे अर्थमंत्री एस. बी. बेहरा यांनी दिली आहे.

दरम्यान, ओडिसाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एस. कुमार यांनी रविवारी स्पष्ट केले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु असलेली कालिया योजना सुरु राहील. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने राज्य सरकार या योजनेत आता नवीन शेतकऱ्यांना जोडू शकणार नाही.

मात्र, असे असले तरी अर्थमंत्री बेहरा यांनी दावा केला आहे की, राज्यातील जवळपास २ टक्के शेतकरी कालिया योजनेपासून वंचित राहिले आहेत. या वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ मार्चपर्यंत मदत निधी जमा केला जाईल.

काय आहे 'कालिया योजना'?
कालिया योजनेच्या माध्यमातून ओडिसा सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाला खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला शेती भांडवलासाठी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये अर्थात वर्षाला १० हजार रुपये देते. तसेच शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचा जीवन विमा देत सुरक्षा कवच दिले आहे. शेतात काम करताना अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त २ लाख रुपयांच्या मदतीची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे ५० हजारापर्यंतचे कृषीकर्ज हे व्याजमुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भूमिहीन आणि शेतमजुरांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओडिसा सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचा दावा ओडिसा सरकार करत आहे.संबंधित बातम्या