उजनी धरणात केवळ ४.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा
12 March 13:47

उजनी धरणात केवळ ४.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा


उजनी धरणात केवळ ४.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

कृषिकिंग, पुणे: पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदायी असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होतीये. सध्या उजनी धरणात केवळ ४.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मागील वर्षी खडकवासलासह वरच्या धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, यावर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, शेतीसाठीचा पाणी उपसा, विविध गावच्या पाणीपुरवठा योजना आणि सध्या सोलापूरसाठी सोडण्यात येणारं पाणी यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

-उजनी धरणातील पाणीसाठ्याची एकूण स्थिती
११७.२३ टीएमसी - उजनी धरणातील एकूण पाणीसाठा
५३.५७ टीएमसी - मृत साठा
६३.६६ टीएमसी - वापरातील साठा
६६.२१ टीएमसी - एकूण शिल्लक पाणीसाठा
२.५५ टीएमसी - उपयुक्त पाणीसाठाटॅग्स

संबंधित बातम्या