सरकारकडून बीटी कपाशी बियाण्याच्या किमतीत कपात; ८० लाख शेतकऱ्यांना फायदा
12 March 12:09

सरकारकडून बीटी कपाशी बियाण्याच्या किमतीत कपात; ८० लाख शेतकऱ्यांना फायदा


सरकारकडून बीटी कपाशी बियाण्याच्या किमतीत कपात; ८० लाख शेतकऱ्यांना फायदा

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने बीटी कपाशी बियाण्याच्या किमान विक्री किमतीत कपात केलीये. यामुळे देशभरातील जवळपास ८० लाख शेतकऱ्यांना याचा होणार आहे. कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, '४५० ग्रॅमच्या बीटी कपाशी (बॉलगार्ड-II) पॅकेटच्या किमतीत कपात करून, ती आता ७३० रुपये (२० रुपये रॉयल्टीसहित) करण्यात आली आहे.

२०१८-१९ च्या पीक वर्षात बीटी कपाशी बियाण्याची किमान विक्री किंमत ही ७४० रुपये (३९ रुपये रॉयल्टीसहित) प्रति पॅकेट इतकी निर्धारित करण्यात आली होती. मात्र, येत्या हंगामात शेतकऱ्यांना बीटी कपाशी बियाण्याच्या प्रति पॅकेटसाठी १० रुपये कमी मोजावे लागणार आहे.

यावर्षीच्या हंगामासाठी रॉयल्टी ३९ रुपयांवरून २० रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. परिणामस्वरूप, देशांतर्गत बियाणे उत्पादक कंपन्यांना याचा फायदा आहे. त्यांना रॉयल्टीच्या स्वरूपात १९ रुपये कमी द्यावे लागणार आहे.

दरम्यान, कपाशी बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांवर अनावश्यक बोजा पडू नये. यासाठी स्वदेशी जागरण मंचसहित अनेक संघटनानी सरकारकडे रॉयल्टी पूर्णपणे हटवण्याची मागणी केली होती. स्वदेशी जागरण मंचचे अश्वनी महाजन यांनी १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बीटी कपाशीच्या बियाण्यावरील रॉयल्टी शुल्क हटवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.संबंधित बातम्या