आमचं पाणी रोखाल तर...आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ- पाकिस्तान
12 March 11:18

आमचं पाणी रोखाल तर...आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ- पाकिस्तान


आमचं पाणी रोखाल तर...आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ- पाकिस्तान

कृषिकिंग, इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोही बाजूने कोंडी करायला सुरुवात केली होती. त्यातच भारताकडून पाकिस्तानचे पाणी रोखण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र भारताने आमचं पाणी रोखल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू, असा इशारा आता पाकिस्तानने भारताला दिला आहे.

"भारत पाकिस्तानला येणाऱं पाणी रोखण्याबाबत आक्रमक होताना दिसत आहे. रावी, सतलज आणि बियास नदीचे पाणी भारताने रोखल्यास तर सिंधू नदी करार मोडल्याने आम्ही भारताविरोधात इंटरनॅशनल कोर्ट फॉर आर्बिट्रेशनमध्ये जाऊ" अशी माहिती पाकिस्तानी जियो न्यूजशी संवाद साधताना पाकिस्तानच्या उच्चतम अधिकाऱ्याने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारं भारताच्या हिस्स्याचे पाणी रोखू असा इशारा दिला होता. त्यावेळी भारताने पाणी रोखलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, अशी भूमिका पाकने घेतली होती. मात्र, गेल्याच आठवड्यात पंजाब सरकारने पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्यासाठी २७०० कोटींच्या निधीला मंजुरी देऊन, प्रत्यक्ष काम सुरू केल्याने पाकिस्तानचा जळजळात झाला आहे.

त्यामुळे या पाकिस्तानी अधिकाऱ्यांने जिओ न्यूजशी बोलताना सांगितले आहे की, "पाणी आणि ऊर्जा मंत्रालय पाकिस्तानचं पाणी भारताकडून रोकण्यात येणार असल्याबाबत चर्चा करत आहे. मात्र सिंधू करारानुसार भारताला असं करता येणार नाही. १९६० मध्ये सिंधू करार झाला होता. यामध्ये पश्चिमेकडे असणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या हद्दीत आहे. तर पूर्वेकडील नद्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी भारताच्या हद्दीत आहे." त्यामुळे भारताने आमचं पाणी रोखल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू, असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.संबंधित बातम्या