जायकवाडीच्या पाणीपातळीत मोठी घट; बाष्पीभवन वाढल्याचा परिणाम
12 March 10:43

जायकवाडीच्या पाणीपातळीत मोठी घट; बाष्पीभवन वाढल्याचा परिणाम


जायकवाडीच्या पाणीपातळीत मोठी घट; बाष्पीभवन वाढल्याचा परिणाम

कृषिकिंग, औरंगाबाद: तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातील बाष्पीभवनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरासरी दरवर्षी बाष्पीभवन प्रक्रियेत जवळपास ११ टीएमसी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. बाष्पीभवनाने सर्वाधिक पाण्याची तूट होणारा जायकवाडी हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे.

जायकवाडी धरणात सद्यस्थितीत केवळ २.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणात ४५.९३९ दलघमी म्हणजेच १.६२ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी सध्या १४९५.४७ फूट एवढी आहे. १४९४.५० फुटानंतर धरणाचा मृतसाठा सुरू होतो. मृतसाठ्यामध्ये जाण्यासाठी आकडेवारीनुसार सध्या धरणामध्ये एक फूट पाणीपातळी शिल्लक असली तरी धरणाची पाणीपातळी आजच जोत्याखाली गेली असल्याचे दिसून आले. जलसाठा जोत्याखाली गेल्याने बाष्पीभवन प्रक्रियेने पाण्याची होणारी तूट चिंतेचा विषय बनला आहे. कारण, येत्या १० दिवसांत ‘डेडस्टॉक’मधून पाणी उचलण्याची वेळ येणार आहे.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये मृतसाठ्यातून (-१३ टक्के) पाणी उचलावे लागले होते. यावर्षी मात्र २०१४ पेक्षा भीषण परिस्थिती असून, मृतसाठ्यातून धरणावर अवलंबून असलेल्या सर्वांच्या पाण्याची गरज पूर्ण होईल का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.संबंधित बातम्या