'राम भरोसे शेती' तरीही पंतप्रधान शेतकरी योजनेपासून अनेक शेतकरी वंचित
12 March 08:30

'राम भरोसे शेती' तरीही पंतप्रधान शेतकरी योजनेपासून अनेक शेतकरी वंचित


'राम भरोसे शेती' तरीही पंतप्रधान शेतकरी योजनेपासून अनेक शेतकरी वंचित

कृषिकिंग, पुणे: राजस्थानात शेती करणे हे 'राम भरोसे आहे'. त्यातच वाळवंटी प्रदेश असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी, परंतु उत्पादन नसल्याच्या बरोबर आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी राजस्थानातील जवळपास ४० टक्के शेतकरी वंचित राहणार आहे.

२ हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्याने राजस्थानातील अनेक शेतकऱ्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलंय. शेती क्षेत्र हे राजस्थानात अधिक आहे. मात्र, शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस झाला तरच शेतं पिकतात. नाहीतर ना खायला धान्य ना असते. अशी इथली परिस्थिती असते. मागील वर्षी तर सामान्यच्या कमी पाऊस झाल्याने, दुबार पेरणी करूनही शेतातुन काहीच मिळालेलं नाही.

हीच परिस्थिती महाराष्ट्रातील मराठवाडा-विदर्भात आहे. विदर्भ-मराठवाड्यातही शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा अधिक जमिनी आहेत. मात्र, सततचा दुष्काळ आणि नापीकीमुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागत नाहीये. त्यातच आता सरकारने जाहीर केलेली मदतही २ हेक्टरच्या अटीमुळे हातची गेली आहे.संबंधित बातम्या