बीडमध्ये शासकीय गोदामाला आग; शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल जळून खाक
11 March 15:16

बीडमध्ये शासकीय गोदामाला आग; शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल जळून खाक

बीडमध्ये शासकीय गोदामाला आग; शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल जळून खाक

कृषिकिंग, बीड: बीड जिल्ह्यातील गेवराईच्या शासकीय वखार महामंडळाच्या गोदामाला आग लागल्याने, जवळपास २० कोटींचं नुकसान झालं आहे. गेवराईच्या शासकीय वखार महामंडळाच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री आग लागली. आगीत कापसाचे गठाण, तूर, सोयाबीन संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. ११ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.

गेवराईत शासकीय वखार महामंडळाचे सात गोडाऊन आहेत. या सातही गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला माल साठवून ठेवला होता. मध्यरात्री अचानक एका गोडाऊनला आग लागली. आग एवढी भीषण होती की, यातील संपूर्ण माल जाळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.संबंधित बातम्या