मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ
11 March 12:14

मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ


मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ

कृषिकिंग, मुंबई: कृषी क्षेत्राची मदार बाजारपेठेवर पडल्यापासून शेती आणि शेतकऱ्यासमोरील आव्हान वाढत चालली आहे. याच अनुषंगाने पिकाच्या मूल्यवर्धनाबरोबर कमी खर्चात उत्तम शेती आणि चांगला भाव मिळावा, यासाठी आयआयटीने संशोधन सुरू केले आहे. यात शेतमालावर प्रक्रिया आणि पॅकेजिंग करून बाजारात नेण्यावर भर दिला जाणार आहे.

शेतीत उत्पादन अधिक झाले तर भाव गडगडात आणि उत्पादन कमी झाले तर शेतकरी संकटात येते, अशी काहीशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकांचे मूल्यवर्धन व्हावे, या हेतुने राज्य शासनाच्या इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटीव्ह फॉर रुरल एरिया’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.

दरम्यान, मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे संयुक्त प्रशिक्षण, संवाद शिबीर पार पडले होते. या शिबिरात परभणीतील ३५ शेतकरी सहभागी झाले होते. त्यातून या संशोधन प्रकल्पाला गती मिळाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या