शेतकऱ्यांनो...तुमच्याकडे हे कार्ड असेल तर, मिळेल ४ टक्के व्याज दराने कर्ज!
10 March 11:00

शेतकऱ्यांनो...तुमच्याकडे हे कार्ड असेल तर, मिळेल ४ टक्के व्याज दराने कर्ज!


शेतकऱ्यांनो...तुमच्याकडे हे कार्ड असेल तर, मिळेल ४ टक्के व्याज दराने कर्ज!

कृषिकिंग, नवी दिल्ली: शेतीची उपकरणे व अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घ्यावं लागतं. कधीकधी तर असं हे कर्ज भरणंही शेतकऱ्यांना अवघड होऊन बसतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घेणं सुलभ व्हावे, यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) सुरु केले आहे. जर शेतकऱ्यांकडे हे किसान क्रेडिड कार्ड असेल तर शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दराने कर्ज मिळते. या सुविधेचा फायदा पशुपालक आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळतो. त्यांनाही या कार्डच्या माध्यमातून ४ टक्के इतक्या अल्प दरात कर्ज मिळते.

कोणाला मिळू शकतं किसान क्रेडिट कार्ड?
शेतीशी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती मग तो स्वतः शेतकरी असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल. तो आपले किसान क्रेडिट कार्ड बनवू शकतो. मात्र, या व्यतीचे कर्ज अवधी समाप्त होईपर्यंतचे वय हे १८ ते ७५ वर्ष च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ६० पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी एक साक्षीदार असणे आवश्यक आहे. तो जवळपासचा नातेवाईक असावा. मात्र, त्या साक्षीदाराचे वय ६० पेक्षा कमी असावे.

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काय कराल?
किसान क्रेडिड कार्ड मिळवण्यासाठी तो शेतकरी गावातील स्थानिक सोसायटीचा सदस्य असावा. यासाठी शेतकऱ्यांना फॉर्म घेऊन, सोसायटीमध्ये जमा करावा लागेल. यासाठी कर्ज पुस्तिका, फोटो, आणि आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागेल. यानंतर शेतकऱ्याला सोसायटीकडून क्रेडिट सेवा पत्रक दिले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बँकांकडून कर्ज मिळू शकेल.
यासंदर्भांतील अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेत चौकशी किंवा शेतकरी कॉल सेंटरशी 1800-180-1551 या क्रमांकावर संपर्क करा.

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडून तीन कागदपत्रे घेतली जातील. पहिले तर ज्या व्यक्तीला कर्ज हवे आहे तो व्यक्ती शेतकरी आहे कि नाही. यासाठी त्या व्यक्तीचे जमिनीची कागदपत्रे बँक पाहिलं त्याची झेरॉक्स मागेल.
दुसरे म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र
आणि तिसरे म्हणजे त्या व्यक्तीचे शपथपत्र, ज्यामध्ये त्याने अन्य बँकेकडून कर्ज घेतलं नसल्याचे सांगणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
कर्ज घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्डसह ३ फोटोंची गरज असते.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे:
-३ लाखांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डवर सर्व प्रक्रिया शुल्क माफ आहे.
-नियमित कर्ज भरल्यास ३ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दर
-विनातारण १ लाख ६० हजारांचे कर्ज उपलब्ध.संबंधित बातम्या