खरीप पिकांच्या हमीभावात १० टक्के वाढीचा प्रस्ताव; राज्याची केंद्राकडे शिफारस
09 March 12:18

खरीप पिकांच्या हमीभावात १० टक्के वाढीचा प्रस्ताव; राज्याची केंद्राकडे शिफारस

खरीप पिकांच्या हमीभावात १० टक्के वाढीचा प्रस्ताव; राज्याची केंद्राकडे शिफारस

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने २०१८-१९ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत २०१९-२० च्या खरीप हंगामात पीकनिहाय खर्चात झालेली वाढ आणि घट लक्षात घेऊन किमान आधारभूत किमतीत भरघोस वाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये १३ पिकांच्या हमीभावावत वाढ करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, कृषी, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कृषी मूल्य आयोगाकडून प्राप्त माहितीच्या आधारे १३ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा पप्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यामध्ये धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल व खरीप कांदा या पिकांचा समावेश आहे. या पिकांच्या हमीभावात राज्य सरकारने जवळपास १० टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या