अल्पकालिक पीक कर्जासाठी आरबीआयची २ टक्क्यांची व्याज सवलत योजना
09 March 08:30

अल्पकालिक पीक कर्जासाठी आरबीआयची २ टक्क्यांची व्याज सवलत योजना


अल्पकालिक पीक कर्जासाठी आरबीआयची २ टक्क्यांची व्याज सवलत योजना

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अल्प मुदत पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना २ टक्के व्याज सवलत (अनुदान) देण्यासाठी नियम अधिसूचित केले आहे. हे नियम २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीसाठी असणार आहे. दरम्यान, या व्याज सवलत योजनेला केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

यामध्ये आरबीआयने सात टक्के व्याज दराने शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत अल्पकालिक पीक कर्ज देण्याचे अधिसूचित केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांनाही २ टक्के प्रति वार्षिक व्याज सहायता देण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, या २ टक्के व्याजाची सूट ही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज तारखेपासून, कर्ज भरणा करण्याच्या तारखेपर्यंत अधिकतम एक वर्षासाठी असणार आहे.

या योज़नेअंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त २ टक्के व्याज सूट देण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांसाठी अल्पकालिक पीक कर्जाचा व्याज दर ४ टक्के प्रति वर्ष इतका असणार आहे.संबंधित बातम्या