गव्हाण रिकामी...जनावरांना पाणी नाही... दूध घटलं; दुग्ध व्यावसायिक चिंतेत
08 March 12:40

गव्हाण रिकामी...जनावरांना पाणी नाही... दूध घटलं; दुग्ध व्यावसायिक चिंतेत


गव्हाण रिकामी...जनावरांना पाणी नाही... दूध घटलं; दुग्ध व्यावसायिक चिंतेत

कृषिकिंग, औरंगाबाद: शेती आणि दुग्ध-व्यवसाय एकमेकांना पूरक आहे. मात्र, यावर्षीच्या भीषण दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची विदारक परिस्थिती निर्माण झालीये. गव्हाण रिकामी...जनावरांना पोटभर चारा मिळेना...जनावरांची पोटं खोल गेलेली... हिरवा चारा नाही. त्यामुळं त्यांचा खुराक वाढला. फार फार आता महिना-पंधरा दिवस पुरंल इतकंच पाणी आहे. पुढं काय करायचं? असा प्रश्‍न दुग्ध व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे.

पुरेसा चारा नाही, प्यायला पाणी नाही. त्यामुळे दूध जनावरांच्या दुधात मोठी घट झालीये. दोन टाइम १२ ते १३ लिटर दूध देणाऱ्या म्हशींच्या दुधात ८ ते ९ लिटरपर्यंत घट झाली आहे. त्यातच पशुपालक टँकरने पाणी विकत घेऊन, जनावरांचा सांभाळ करताहेत. चाऱ्यासाठीही मोठा खर्च होतोय. त्यामुळे दुधात झालेली घट ही शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे.

जनावरांसाठी सरकारने चारा छावण्यांची व्यवस्था करावी. अशी मागणी या शेतकरी पशुपालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, दुष्काळी उपाययोजना म्हणून चारा छावण्या सुरु करण्याचा सरकारचा निर्णय अजूनतरी कागदावरच असल्याचे समोर येत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या