हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे; भारत इंडिया फोरमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
08 March 11:59

हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे; भारत इंडिया फोरमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन


हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे; भारत इंडिया फोरमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

कृषिकिंग, मुंबई: "रब्बी हंगामातील नवीन हरभरा बाजार समित्यांमध्ये दाखल होतोय. मात्र, या हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे ५०० रुपयांचा फटका सहन करावा लागतोय. त्यामुळे राज्यातील हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासह, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे." अशी मागणी भारत इंडिया फोरमकडून मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने चालू वर्षीच्या हंगामासाठी हरभऱ्याला ४६२० रुपये किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे. मात्र, राज्यातील बाजार समित्यांसह वायदा बाजारात हरभऱ्याला ४१४० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचाच दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. असेही भारत इंडिया फोरमने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

२८ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या सरकारी अनुमानानुसार, यावर्षी देशभरात १०३ लाख टन हरभऱ्याचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर नाफेडच्या उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षीचा १९ लाख टन हरभरा साठा शिल्लक आहे. अर्थात यावर्षी देशभरात १२२ लाख टन हरभरा उपलब्ध असणार आहे. अर्थात देशाच्या एकूण मागणीपेक्षा ८ ते १० टक्के इतका हरभरा अतिरिक्त ठरणार आहे. त्यामुळे बाजारात दबाब आहे. या पार्श्वभूमीवर भारत इंडिया फोरमकडून हरभरा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणीही या निवेदनाद्वारे भारत इंडिया फोरमने केली आहे.
harbharaBIF8mar19.pdfसंबंधित बातम्या