पंजाब सरकार पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन
08 March 10:46

पंजाब सरकार पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन


पंजाब सरकार पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन

कृषिकिंग, चंदीगड: पुलवामा येथे भारतीय सैन्यावर करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी रोखण्याचे संकेत दिले होते. त्यातच आता काँग्रेसची शासित पंजाब सरकारनेही या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज (शुक्रवार) पठानकोट येथे धरणाच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत.

दरम्यान, स्थानिक जिल्हाधिकारी रामवीर यांनी रावी येथील विश्रामगृहावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत धरणाच्या जागेचीही पाहणी केली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती माध्यमांना दिली आहे. पंजाब सरकारने या धरणासाठी २०६ कोटी रुपये मंजूर केले असून, एकूण खर्च २७०० कोटी रुपये अपेक्षित आहे.

काश्मीर खोऱ्यातून पाकिस्तानकडे वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी मोठी धरणे बांधून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. त्याचा फायदा जम्मू काश्मीर, पंजाबसह इतर उत्तरेकडील राज्यांना होणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या