बीजेपी सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी- राजू शेट्टी
07 March 18:58

बीजेपी सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी- राजू शेट्टी


बीजेपी सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी- राजू शेट्टी

कृषिकिंग, पुणे: "प्रतिक्विंटलला हमीभावापेक्षा १००० ते १२०० रुपये कमी दर देऊन एकरी दोन हजार रुपये मदत सरकार देतंय. शेतकऱ्यांचे खिशे कापून त्यांनाच परत पैसे देत, केंद्र सरकार काय उपकार करत नाही. हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी ही चोरांची टोळी आहे," असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. बारामती येथे एका भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकार ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर देत आहे, हमीभाव आणि बाजारभाव यात हजार ते बाराशे रुपयांचा फरक पडत आहे. आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत, अशी नेहमीच संघटनेची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर आपण कायमच याला विरोध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.संबंधित बातम्या