आतापर्यत २ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा- कृषिमंत्री
07 March 14:26

आतापर्यत २ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा- कृषिमंत्री

आतापर्यत २ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा- कृषिमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील २ कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे." अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची केली आहे. या योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये दिले जाणार आहे. यानुसार मार्च महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व शेतकऱ्यांना २००० हजारांचा पहिला हप्ता देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. या दिवशी जवळपास १ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला होता.संबंधित बातम्या