धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या
06 March 18:49

धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या


धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या

कृषिकिंग, मुंबई: मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं एका माहिती अधिकारातून समोर आलं आहे. राज्यात गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण ९१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत विचारणा केली होती. त्याद्वारे त्यांना ही माहिती मिळाली आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या २४ एप्रिल २०१५ च्या एका पत्रानुसार सन २०११ ते २०१४ या कालावधीत ६ हजार २६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते. मात्र, जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ११ हजार ९९५ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे या पीडित कुटुंबीयांपैकी ४३ टक्के शेतकरी कुटुबीयांना कुठलाही मोबदला किंवा सरकारची मदत मिळाली नसल्याचंही समोर आलं आहे.

घाडगे यांनी मुख्यत्वे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यात ४ हजार ३८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकूण ४ हजार १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, शेतकरी आत्महत्येनंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येतो. त्यानुसार सरकारी दफ्तरी या आत्महत्येची नोंद ठेवण्यात येत असते.टॅग्स

संबंधित बातम्या