सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार
06 March 12:31

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार


सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान मिळणार

कृषिकिंग, मुंबई: "२०१६-१७ च्या खरीप हंगामामध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारक व्यापाऱ्यांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे देण्यात येणार आहे." अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख दिली आहे. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१६-१७ च्या हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत २७७५ रुपये प्रति क्विंटल इतकी निर्धारित केली होती. मात्र, असे असताना राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन २४०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात होती. त्यामुळे त्यावर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० ते ३५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. २०१६-१७ या पीक वर्षात देशात १४.०१ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते.

दरम्यान, २०१७-१८ च्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ३०५० रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली होती. तर चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ३३९९ रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या