चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने मंजूर करून छावण्या सुरू करा- पाटील
06 March 10:35

चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने मंजूर करून छावण्या सुरू करा- पाटील


चारा छावण्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने मंजूर करून छावण्या सुरू करा- पाटील

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत. तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात. तसेच नादुरुस्त जुन्या पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याचे निर्देश महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत २८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे.

दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पाटील यांनी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख व संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे २७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित निधी तातडीने वितरित करण्यात यावा. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला कामे देण्यात यावीत. यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्यासाठी १४७ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.संबंधित बातम्या