पंजाबच्या शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन; २५ रेल्वेगाड्या रद्द; पाहा काय आहे बातमी?
05 March 17:09

पंजाबच्या शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन; २५ रेल्वेगाड्या रद्द; पाहा काय आहे बातमी?


पंजाबच्या शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन; २५ रेल्वेगाड्या रद्द; पाहा काय आहे बातमी?

कृषिकिंग, अमृतसर(पंजाब): स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी बंडाचं हत्यार उपसलंय. अमृतसर येथे रेल्वे रुळांवर बसून शेतकऱ्यांनी विरोध प्रदर्शन केलं आहे. ज्यामुळे जवळपास २५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी फिरोजपूर आणि जालंधर- अमृतसर रेल्वे रुळावर जंडियाला येथे धरणे आंदोलन सुरु केलं आहे. या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागच्या दोन वर्षात प्रदेशात ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, अजूनही केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेल्या नाहीत.

याशिवाय या शेतकऱ्यांची मागणी आहे की, राज्य सरकारने जंगली जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. दरम्यान, सरकारी अधिकारी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहे.संबंधित बातम्या