गेल्या दोन महिन्यात राज्यातील २८२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
05 March 14:14

गेल्या दोन महिन्यात राज्यातील २८२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या


गेल्या दोन महिन्यात राज्यातील २८२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषिकिंग, मुंबई: जानेवारी व फेब्रुवारी २०१९ या दोनच महिन्यात राज्यातील जवळपास २८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भांतील माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

यामध्ये सर्वाधिक ९६ आत्महत्या या अमरावती विभागात, औरंगाबाद विभागात ९१ तर नाशिक, पुणे, नागपूर व कोकण विभागातील ९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सततचा दुष्काळ, नापिकी, मालाला न मिळणारा दर, बँकांकडून कर्ज देण्यात होणारा हलगर्जीपणा, सावकारी या नानाविध कारणांमुळे शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यातूनच निराशा येत शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या