शेतकऱ्यांनी बाजारपेठ आधारित सामूहिक शेती करावी- डॉ.अशोक दलवाई
05 March 11:51

शेतकऱ्यांनी बाजारपेठ आधारित सामूहिक शेती करावी- डॉ.अशोक दलवाई


शेतकऱ्यांनी बाजारपेठ आधारित सामूहिक शेती करावी- डॉ.अशोक दलवाई

कृषिकिंग, नाशिक: "वारसा हक्काने दिवसेंदिवस जमिनीचे तुकडे होताहेत. मात्र, आता शेतीपेक्षाही शेतकरी टिकला पाहिजे हे महत्वाचं झालंय. म्हणूनच शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यासाठी लागणारे उत्पादन अन्‌ बाजारपेठेवर आधारित आता सामूहिक शेती करणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अवर्षण-प्रवणक्षेत्र प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले आहे.

ते नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात "शेतकरी उत्पादक कंपन्यांपुढील संधी व आव्हाने', या विषयावर बोलत होते. "फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' आणि "कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंग' यांची सांगड घालावी आणि विपणन व प्रक्रियेला सामूहिक शेतीतून चालना द्यावी. असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शेतीला "व्हॅल्यू चेन'मध्ये रुपांतरीत करावे लागेल. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना विचार आणि संशोधन करावे लागेल. एफ. पी. ओ. आणि "कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंग'ची सांगड घालत उत्पादन खर्च कमी करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले आहे.संबंधित बातम्या