शेतकरी सन्मान योजनेचा निधी कर्ज खात्यात जमा न करता थेट द्या; सरकारचे बँकांना निर्देश
04 March 14:53

शेतकरी सन्मान योजनेचा निधी कर्ज खात्यात जमा न करता थेट द्या; सरकारचे बँकांना निर्देश


शेतकरी सन्मान योजनेचा निधी कर्ज खात्यात जमा न करता थेट द्या; सरकारचे बँकांना निर्देश

कृषिकिंग, पुणे: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी राज्यातील अनेक बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेले २००० रुपये शेतकऱ्यांना न मिळता कर्जवसुली स्वरूपात जमा झाले आहे. तुटपुंजी रक्कम, त्यातही बँकांनी वळती केल्याने शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहे. असेच म्हणावं लागेल.

मात्र, शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात आलेली रक्कम थेट देण्यात यावी. ती कर्जवसुली किंवा अन्य स्वरूपात जमा करू नये. असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने बँकांना दिले आहेत.

राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले आहे की, "ज्या बँकांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेली पीएम-किसान योजनेची रक्कम कर्ज खात्यात वळती केली आहे. अशा बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय बँकांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात ज्या शेतकऱ्यांची रक्कम कर्ज खात्यात जमा झाली आहे. त्या शेतकऱ्यांना ती रक्कम विनाअडथळा अदा करण्यात यावी. असे सांगण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या