४ मार्च- महाशिवरात्री
04 March 11:09

४ मार्च- महाशिवरात्री


४ मार्च- महाशिवरात्री

सर्व शेतकरी बांधवांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
।।जय शिव शंभो।।
महाशिवरात्र माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात संपन्न होते. इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. या दिवशी शैव पंथीयांबरोबरच सामान्य जनही उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगाला लेपन केले जाते. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा केली जाते.टॅग्स

संबंधित बातम्या