पश्चिम विदर्भातील २८ दुष्काळी तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी
01 March 12:45

पश्चिम विदर्भातील २८ दुष्काळी तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी


पश्चिम विदर्भातील २८ दुष्काळी तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी

कृषिकिंग, अमरावती: पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या ६ लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत ४७४ कोटी ३६ लाखांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे, तर २२ फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्याचे ३२६ कोटी पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ६ लाख ८९ हजार ७२८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३४६ कोटी ९७ लाखांचा मदतनिधी जमा करण्यात आलेला आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार अमरावती विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागल्याने शासनाने ३१ आॅक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या सर्व तालुक्यांत पीक कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यांत ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून ही मदत देण्यात आली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या