अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी पुन्हा अर्जाची छाननी- पाटील
01 March 12:13

अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी पुन्हा अर्जाची छाननी- पाटील


अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी पुन्हा अर्जाची छाननी- पाटील

कृषिकिंग, मुंबई: कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची तालुका स्तरावर छाननी करून, त्यांना ग्रीनलिस्टमध्ये आणणार असल्याची माहिती राज्याचे कृषी, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानपरिषदेत दिली आहे.

कर्जमाफीसाठी २ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम अजूनही शिल्ल्क असल्याने, अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा. यासाठी पुन्हा अर्जाची छाननी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेत कर्जमाफी आणि दुष्काळावर चर्चा अपेक्षित असल्याने पाटील यांनी याविषयी अधिक माहिती देत सदस्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी सभागृहात ही माहिती दिली आहे. याशिवाय दुष्काळासाठी राज्य सरकारने वॉर रूम सुरू केली असल्याचे सांगून, दुष्काळी उपाययोजनांमध्ये सदस्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.संबंधित बातम्या