उत्तरप्रदेशात जोरदार गारपीट; गव्हासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान
01 March 08:30

उत्तरप्रदेशात जोरदार गारपीट; गव्हासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान

उत्तरप्रदेशात जोरदार गारपीट; गव्हासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान

कृषिकिंग, लखनऊ: उत्तरप्रदेशच्या बरेली, लखीमपुर आणि शाहजहांपुर जिल्ह्यांमध्ये बुधवारी दुपारी ३ वाजल्याचा सुमारास जोरदार गारपीट झाली आहे. इतकंच नाही तर बरेली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर गारपिटीमुळे बर्फाची चादर पाहायला मिळाली. जवळपास १ तास चाललेल्या गारपिटीमुळे गहू, मोहरी, बटाटा, मसूर, वाटाणा आणि अफिम सारख्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

बरेलीमध्ये बुधवारी सकाळपासूनच ढग जमा झाले होते. दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास अचानक अंधारून आले. आणि पाहता-पाहता जोरदार पावसासह गारपीट सुरु झाली. या गारपिटीसह झालेल्या जोरदार पावसामुळे आगाऊ गहू व मोहरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.संबंधित बातम्या