महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडे बाजार ठाण्यात सुरु होणार
28 February 18:15

महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडे बाजार ठाण्यात सुरु होणार


महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडे बाजार ठाण्यात सुरु होणार

कृषिकिंग, ठाणे: ठाण्यात महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार सुरु होणार आहे. संस्कार संस्था व राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १ मार्चला (शुक्रवार) ठाण्यातील हितवर्धिनी सभा मैदान, उमा नीलकंठ व्यायाम शाळा, नौपाडा ठाणे या ठिकाणी हा बाजार सुरु होणार आहे.

उद्या (शुक्रवार) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या महिला शेतकरी आठवडी बाजाराचे उदघाटन होणार आहे. या आठवडी बाजाराला ठाणेकरांनी अवश्य भेट द्यावी व महिला शेतकऱ्यांना बळ द्यावे. असे आवाहन आयोजक आमदार संजय केळकर यांनी केले आहे.

सोलापूरमधील हा महिला शेतकरी गट असून, वांगी, गाजर, मटार, भेंडी, मेथी, कोथांबीर, कोबी, फ्लॉवर, दुधी, शिमला मिर्ची, घेवडा, शेवगाच्या शेंगा, आले, लिंबे, कांदा, बटाटे, डाळिंब, द्राक्षे, चिकू असे विविध फळे व भाज्या विक्रीसाठी असणार आहे.संबंधित बातम्या