शेतकऱ्यांच्या वार्षिक मदत निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही
28 February 16:30

शेतकऱ्यांच्या वार्षिक मदत निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही


शेतकऱ्यांच्या वार्षिक मदत निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही

कृषिकिंग, पुणे: केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हेक्‍टरपर्यंतच्या वार्षिक ६ हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ न मिळणाऱ्या मात्र कोडवाहू भागात धारण क्षेत्र हे सरासरी जास्त असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत निधी घोषणा केली जाणार होती.

खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत तरतूद केलेली नाही. यामुळे आता अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर केल्यानंतर, राज्यातही या योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री सन्मान योजना’ राबवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. अर्थसंकल्पात अत्यल्प आणि अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष १२ हजार रुपये इतके अनुदान देण्याचा विचार सुरु होता. याबाबत मुनगंटीवार यांनीही दुजोरा दिला होता. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.संबंधित बातम्या