अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न
28 February 11:17

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न


अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न

कृषिकिंग, पुणे: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये शेतकरी वर्गाच्या नाराजीचा फटका भाजपला बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी वर्ग, कृषी, सिंचन, शेततळी, दुष्काळ निवारण याद्वारे ग्रामीण भागाला सत्ताधारी भाजपने प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील मतदार विरोधात जाणार नाहीत, याची खबरदारी या माध्यमातून घेण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी ग्रामीण भागाला प्राधान्य दिले होते. या धर्तीवरच राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दुष्काळ हा सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिकता निधीतून दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली. ग्रामीण भागांशी संबंधित योजनांना मागील वर्षांच्या तुलनेत वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या महत्वपूर्ण तरतुदी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. http://www.krushikingnews.com/newsdetails1.php?goytrarenyarjf&100106163संबंधित बातम्या