महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठ्या घोषणा
27 February 16:54

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठ्या घोषणा


महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१९: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठ्या घोषणा

कृषिकिंग, मुंबई: आज (बुधवार) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला गेला. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला आहे.

यावर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. पुढच्या ६ महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने या कालावधीसाठीचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

शेतकऱ्यांसाठीच्या महत्वपूर्ण घोषणा:
- यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
- अपुऱ्या पावसामुळे बाधित १५१ दुष्काळग्रस्त तालुके व २६८ महसूल मंडळे व ५ हजार ४४९ दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पाहोचवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर १ लाख ३० हजार शेततळी पूर्ण झाली आहेत. यावर्षी ५ हजार १८७ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या वस्तूंसाठी (अवजारे) ३ हजार ४९८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- कृषी पंपांना विदयुत जोडणी देण्यासाठी यावर्षी ९०० कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय.
- जलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी १५०० कोटी रूपयांची तरतूद.
- बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3366 कोटी रुपयांची मदत वितरीत
- शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी निधी उपलब्ध करून देणार.
- राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.
- याशिवाय ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी ५०० कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
- दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज बिलाची ५ टक्के रक्कम शासन देणार.संबंधित बातम्या