सौर कृषिपंप योजनेला मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद; मात्र, नोंदणी पोर्टल बंद
27 February 14:45

सौर कृषिपंप योजनेला मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद; मात्र, नोंदणी पोर्टल बंद


सौर कृषिपंप योजनेला मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद; मात्र, नोंदणी पोर्टल बंद

कृषिकिंग, औरंगाबाद: मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. मार्चअखेरपर्यंत राज्यभरात २५ हजार शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचा संकल्प महावितरणने केलाय. यामध्ये एकट्या मराठवाड्यातूनच १३ हजार ५२८ शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी कोटेशन भरले आहे, तर ४ हजार ३७४ जणांनी महावितरणकडे रीतसर पैसेही भरले आहेत.

मात्र, या योजनेचा फज्जा उडू नये म्हणून महावितरणने मागील आठ दिवसांपासून नोंदणीचे पोर्टलच बंद करून ठेवले आहे. यासंदर्भात औरंगाबादपासून मुंबईपर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तांत्रिक अडचण आल्यामुळे पोर्टल बंद आहे, एवढेच सांगितले जाते; पण पोर्टल कधी सुरू होणार, याबद्दल मात्र कोणीही ठामपणे सांगत नाही.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमुळे दिवसा अखंडित सिंचन करण्याची सुविधा मिळणार आहे. विद्युत बिलाची झंझट राहाणार नाही आणि अनुदान तत्त्वावर पंप मिळणार आहे, या कारणांमुळे ही योजना शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. ज्यादिवशी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या नोंदणीसाठी पोर्टल सुरू झाले. त्या दिवसापासून नोंदणी करण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.संबंधित बातम्या