आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; कृषी क्षेत्रावर विशेष भर असण्याची शक्यता
27 February 10:29

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; कृषी क्षेत्रावर विशेष भर असण्याची शक्यता


आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; कृषी क्षेत्रावर विशेष भर असण्याची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आगामी निवडणूक पाहता आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या कोरडवाहू आणि जिरायत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच रोजगाराबाबतही काही घोषणा होऊ शकतात. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दिशेने काही घोषणा होण्याची शक्यता आहे.

दुपारी दीड वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वा विधानसभेत सन २०१९-२० चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आज सादर होणार अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुढील ३ महिन्याच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. यामध्ये दुष्काळ संदर्भातल्या उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद अर्थसंकल्प मांडतांना करावी लागणार आहे.



संबंधित बातम्या