...या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी सूट
27 February 08:30

...या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी सूट


...या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी सूट

कृषिकिंग, नवी दिल्ली: "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पूर्वोत्तर राज्यांमध्ये पट्टे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देण्याची आवाहन केंद्र सरकारकडून पूर्वोत्तर राज्यांना करण्यात आले आहे. या राज्यांमध्ये जमिनीवर शेतकऱ्यांच्या मालकी हक्क नसल्याने ही योजना लागू करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यातील शेतकऱ्यांना काही नियमांमध्ये सूट देण्याची घोषणा केली आहे." अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, राज्यातील सामुदायिक समित्यांसोबत मिळून शेतकऱ्यांचा आकडेवारी निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. या राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही अजून पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पट्टे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमात सूट दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना सामुदायिक समितीच्या प्रमुखासोबतच्या पट्टेवाल्या जमिनीचा हलफनामा द्यावा लागणार आहे. या प्रमुख आधारावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मणिपूरसह ईशान्यकडील पूर्वोत्तर सर्वच राज्यांना ही अडचण येत आहे. असेही त्यांनी सांगितले यावेळी आहे.संबंधित बातम्या