शेतकऱ्यांच्या दीडपट हमीभावासाठी दिल्ली सरकारची १०० कोटींची तरतूद
26 February 18:10

शेतकऱ्यांच्या दीडपट हमीभावासाठी दिल्ली सरकारची १०० कोटींची तरतूद


शेतकऱ्यांच्या दीडपट हमीभावासाठी दिल्ली सरकारची १०० कोटींची तरतूद

कृषिकिंग, नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे दीडपट हमीभाव देण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (मंगळवार) दिल्ली सरकारचा २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे की, "कृषी क्षेत्रासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणारे दिल्ली हे पहिलेच राज्य आहे. यासाठी सरकारकडून १०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे." यावेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन "स्मार्ट कृषी योजने'चीही घोषणा केली आहे.

दरम्यान, चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (६ फेब्रु २०१९) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी स्वाभिमान आयॊगाच्या शिफारशी लागू केल्याची घोषणा केली होती.संबंधित बातम्या