दुष्काळाच्या झळा; काळ्या रानात जनावरं घोळून-घोळून चघळतात पालापाचोळा
26 February 17:03

दुष्काळाच्या झळा; काळ्या रानात जनावरं घोळून-घोळून चघळतात पालापाचोळा


दुष्काळाच्या झळा; काळ्या रानात जनावरं घोळून-घोळून चघळतात पालापाचोळा

कृषिकिंग, औरंगाबाद: यावर्षी राज्यभरात भीषण दुष्काळ आहे. 'खायला दाणा नाही, जनावरांना चारा नाही, पाणी नाही' असं भीषण वास्तव राज्यातील सर्वच भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात तर जनावरं काळया रानात पालापाचोळा खाऊन गुजराण करत आहे.

यावर्षी खरिपात काहीच हाती लागलं नाही तर रब्बी संपूर्ण वाया गेला. शेतकरी, शेतमजुरांना काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, उपाययोजना करण्याच्या बाबतीत बोंबाबोंब असल्याचेच सर्वत्र चित्र आहे. पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या