शेतकऱ्यांची माहिती देण्यास ओडिसा सरकार टाळाटाळ करतंय
26 February 12:37

शेतकऱ्यांची माहिती देण्यास ओडिसा सरकार टाळाटाळ करतंय


शेतकऱ्यांची माहिती देण्यास ओडिसा सरकार टाळाटाळ करतंय

कृषिकिंग, भुवनेश्वर: केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि कृषी राज्यमंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी ओडिसाच्या बीजद सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी ओडिसाच्या शेतकऱ्यांचा डेटा न मिळाल्याने त्यांनी बिजद सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठीची शेतकऱ्यांची माहिती तात्काळ केंद्राला सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

ओडिसामधील बौद्ध जिल्ह्यात आयोजित सभेत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की, "ओडिसा सरकार ही हितदायी योजना लागू करण्यास प्रथम इच्छुक नव्हती. नंतर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला केवळ ९ लाख शेतकऱ्यांचा डेटा सुपूर्द करण्यात आला. हे समजण्या पलीकडचे आहे की, ओडिसा सरकार शेतकऱ्यांची माहिती देण्यात इतका उशीर का करत आहे." इतकंच नाही तर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर हल्ला चढवताना त्यांनी म्हटलं आहे की, पटनायक यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि ओडिसा सरकार यांच्यात अडथळा आणण्याचं काम करू नये.

तर तिकडे केंद्रीय कृषी मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भुवनेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात बीजू जनता दल (बीजद) सरकारवर निशाणा साधताना सांगितले आहे की, "राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी ओडिसा सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची माहिती केंद्राकडे सुपूर्द करावी."संबंधित बातम्या