पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी साडेतीन तासातच परत घेतला!
26 February 10:40

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी साडेतीन तासातच परत घेतला!


पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी साडेतीन तासातच परत घेतला!

कृषिकिंग, नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून मोठ्या थाटात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. योजनेचा पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये रविवारी शेतकऱ्याच्या बँक जमाही करण्यात आले. मात्र, आता काही तासांतच ही रक्कम परत काढून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील अशोक लहागमे या शेतकऱ्याला रविवारी दुपारी दोन हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस आला. मात्र, त्यांच्या खात्यातून ही रक्कम अवघ्या साडेतीन तासातच काढून घेण्यात आल्याचा दुसरा एसएमएसही नंतर त्यांना आला.

रविवारची बँक बंद असल्याने त्यांनी सोमवारी बँकेत जाऊन, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी मुंबई कार्यालयाला ईमेल करा असे सांगत हात वर केले आहे.

तर तिकडे नांदेड जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात २ लाख ६० हजार ३०४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरुवात झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली. बँकेत दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर आनेकांना सुखद धक्का बसला.

मात्र, केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेतील अनुदान हस्तांतरित करतांना तांत्रिक चूक झाल्याचे सांगून काही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केलेली रक्कम परत सरकारच्या खात्यात जमा करण्याची सूचना दिली. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे परत घेण्यात आले आहेत. त्यांना लवकरच पैसे पुन्हा मिळतील, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.संबंधित बातम्या