शेतकरी कर्जमाफी योजना सुरूच राहणार- मुख्यमंत्री
25 February 14:50

शेतकरी कर्जमाफी योजना सुरूच राहणार- मुख्यमंत्री


शेतकरी कर्जमाफी योजना सुरूच राहणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरुच राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्यावरही चर्चा होईल आणि ११ विधेयकं मांडली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांगितले आहे.

जानेवारी महिन्यात केंद्र सरकारनं ४ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे देण्याचं मान्य केलं आहे. राज्यानं दुष्काळ मदत वाटप सुरू केली आहे. ८२ लाख शेतकऱ्यांना दुष्काळी मदत करायची आहे. आत्तापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

तसेच पीक विम्याचे पैसेही दिले जात आहेत. आत्तापर्यंत ५१ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे. १८ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तर २४ हजार कोटी बँकांमार्फत दिले जाणार आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.संबंधित बातम्या