राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनाही वार्षिक मदत मिळणार- मुख्यमंत्री
25 February 14:34

राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनाही वार्षिक मदत मिळणार- मुख्यमंत्री


राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनाही वार्षिक मदत मिळणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पाच एकरच्या मर्यादेमुळे वंचित राहणाऱ्या राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली आहे. या योजनेच्या घोषणेतून विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

राज्यात काही भागांत कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पाच एकरांवरील अशा कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

तसेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरतील. यापैकी ५२ लाख शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. बाकीची यादी देण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना योजनेतील पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.संबंधित बातम्या