पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ
25 February 10:37

पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ


पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ

कृषिकिंग, मुंबई/गोरखपूर: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून करण्यात आला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी २ हजार २१ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहे.

या योजनेच्या शुभारंभप्रसंगी वर्षा निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव डी.के.जैन, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १४ लाख २६ हजार ९२७ शेतकऱ्यांना २ हजाराचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ काही आठवड्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा या योजनेमध्ये समावेश आहे.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचेही वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या वतीने मुरबाडचे गौतम चिंतामन पवार यांनी प्रतिनिधीत्व केले असून, त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. हा क्षण महाराष्ट्रातील ‘अन्नदाता’ शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.संबंधित बातम्या