मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर शेतात उतरवलं; मात्र, अजूनही शेत पूर्ववत केलेलं नाही
23 February 17:48

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर शेतात उतरवलं; मात्र, अजूनही शेत पूर्ववत केलेलं नाही


मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर शेतात उतरवलं; मात्र, अजूनही शेत पूर्ववत केलेलं नाही

कृषिकिंग, वाशीम: बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे ३ डिसेंबर २०१८ ला नगारा भूमीपूजनच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते.

यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरसाठी पोहरादेवीचे शेतकरी भाऊराव घुगे यांच्या ५ एकर शेतात हेलिपॅड बनवण्यात आलं होतं. ते बनवताना घुगे यांना शेत पूर्ववत करून देऊ तसंच काही नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं.

पण, आज तब्बल अडीच महिन्यानंतरही हे हेलिपॅड आहे, तसंच आहे. त्यांनी रब्बी पीकाचं आणि पाईपलाईनचं नुकसान करुन जागा उपलब्ध करुन दिली, पण प्रशासनानं त्यांचं शेत पूर्ववत केलेलं नाही. शेतकरी भाऊराव घुगे यांनी प्रशासनाकडे तीन वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, त्याची दखल अजून कुणीही घेतलेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या काडीलाही धक्का न लावणाऱ्या छत्रपत्री शिवरायांच्या महाराष्ट्रात, आज एका शेतकऱ्याला आपल्या झालेल्या पीक नुकसानसाठी हेलपाटे मारावे लागत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे असंच म्हणावं लागेल.संबंधित बातम्या