तेलंगणा अर्थसंकल्प: कृषीसाठी २० हजार १०७ कोटींची तरतूद
23 February 17:15

तेलंगणा अर्थसंकल्प: कृषीसाठी २० हजार १०७ कोटींची तरतूद


तेलंगणा अर्थसंकल्प: कृषीसाठी २० हजार १०७ कोटींची तरतूद

कृषिकिंग, हैद्राबाद: "तेलंगणा सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला असून, यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. कृषीसाठी यावर्षी सरकारने २० हजार १०७ कोटींची तरतूद केली आहे." अशी माहिती विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली आहे.

तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे देशातील कृषी क्षेत्रासाठी राज्य आदर्श बनले आहे. रायथू बंधु, रायथू भीमा, भूमी अभिलेख अद्ययावत, शेतकरी समन्वय समित्या आणि इतर योजना व कार्यक्रमांद्वारे सरकारने शेती क्षेत्र व शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे. असेही के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगितले आहे.

याशिवाय, तेलंगणा सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अन्य कृषी विषयक बाबींसाठी, अर्थात सिंचनासाठी २२ हजार ५०० कोटींची तर अन्नधान्य अनुदानासाठी २ हजार ७४४ कोटींची तरतूद केली आहे.संबंधित बातम्या