शेतकऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी दया; अन्यथा... - साखर आयुक्त
23 February 15:51

शेतकऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी दया; अन्यथा... - साखर आयुक्त


शेतकऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी दया; अन्यथा... - साखर आयुक्त

कृषिकिंग, लखनऊ: "राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत त्यांना अदा करावी, अन्यथा थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल." अशी इशारा उत्तरप्रदेशचे साखर आयुक्त संजय.आर. भूसरेड्डी यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे.

"साखर आयुक्तांनी राज्यातील कारखान्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर थकबाकी देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. ज्या कारखान्यांनी २०१७-१८ च्या हंगामातील १०० टक्के थकबाकी शेतकऱ्यांना दिली आहे. त्या कारखान्यांनी २०१८-१९ च्या हंगामातील थकबाकी एक कालावधी सुनिश्चित करून शेतकऱ्यांना अदा करावी." असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, सध्यस्थितीत उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडे राज्यातील शेतकऱ्यांची जवळपास ८ हजार कोटींची थकबाकी शिल्लक आहे.टॅग्स

संबंधित बातम्या