तेलंगणा सरकार शेतकऱ्यांचे १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार
23 February 14:59

तेलंगणा सरकार शेतकऱ्यांचे १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार


तेलंगणा सरकार शेतकऱ्यांचे १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार

कृषिकिंग, हैद्राबाद: तेलंगणा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार तेलंगणातील शेतकऱ्यांचे ११ डिसेंबर २०१८ पर्यंतचे १ लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे की, "राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ६ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे." दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत के.चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री राव लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करु शकतात.

याशिवाय तेलंगणा सरकारने रायतू बंधू योजनेनंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणाऱ्या आर्थिक तरतुदीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सध्या देण्यात येणाऱ्या ८ हजारांऐवजी १० हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.संबंधित बातम्या