पूरग्रस्त महिला म्हणाली,
24 February 13:00

पूरग्रस्त महिला म्हणाली,


पूरग्रस्त महिला म्हणाली,

कृषिकिंग, नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात झालेल्या सदृष्य ढगफुटीच्या अतिवृष्टीने काही दिवसांपूर्वी शहरातील रंगावली नदीला महापूर आला होता. या महापुरात नवापूर शहरातील शेकडो घरे पाण्यात गेल्याने अनेक संसार उघड्यावर आले होते. त्यावेळी नवापूर शहरासह तालुक्यातील ३२८ पूरग्रस्ताना प्रत्येकी ६ हजार ५०० रूपयांप्रमाणे प्रशासनाने तातडीची मदत केली होती.

मात्र, महापुरात इदगाह परिसरातील मातंग समाजातील आशाबाई मांडोळे यांचे केवळ शौच्छालयच शिल्लक राहिले होते. संसार उपयोगी साहित्य पूराच्या पाण्यात वाहून गेले होते. मुलीच्या लग्नाचे दागिने सुद्धा वाहून गेल्याने आशाबाई मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या. या बिकट परिस्थितीत मुलीचे लग्न कसे करावे? असा प्रश्न निर्माण झाला होता. पुढील महिन्यात लग्न असल्याने जिल्हाधिकारी डाॅ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी मुलीच्या लग्नासाठी ८२ हजारांची मदत केली आहे. यापूर्वी देखील नंदुरबार लायन्स फेमिना ग्रुपतर्फे लग्नाचे दागिने, साडी, संसारोपयोगी साहित्य देऊन या महिलेची मदत केली होती.

विशेष म्हणजे डॉ. कलशेट्टी यांची कोल्हापूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली आहे. माजी जिल्ह्याधिकार्‍यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या मदतीने पूरग्रस्त आशाबाई मांडोळे या गहिवरल्या. 'जिल्हाधिकारी आमचे माय बाप आहेत. माझी परिस्थिती नाजूक असताना मुलीच्या लग्नाला मोठी मदत केल्याने वडिलांचे उणीव भासू दिली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया पूरग्रस्त आशाबाई मांडोळे यांनी व्यक्त केली आहे.

इतकंच नाही तर महापुरात मास्टर बॅन्ड पाण्यात वाहून गेल्याने तनवीर शेख यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यांना देखील जिल्हाधिकारी डाॅ.कलशेट्टी एक लाखांची मदत केली. आर्थिक मदत मिळाल्याने मास्टर बॅन्ड पुन्हा सुरू झाल्याने त्यावरील पंधरा युवकाचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे. कोल्हापुरात बदली झाली असतानाही पूरग्रस्तांना मदत करणारा हा अधिकारी सामाजिक बांधिलकी जपत या पूरग्रस्तांसाठी देवदूतासारखा धावून आला. असंच म्हणावं लागेल.संबंधित बातम्या