मराठवाड्याला आणखी ७२२ कोटींचा दुष्काळ अनुदान निधी
23 February 11:15

मराठवाड्याला आणखी ७२२ कोटींचा दुष्काळ अनुदान निधी


मराठवाड्याला आणखी ७२२ कोटींचा दुष्काळ अनुदान निधी

कृषिकिंग, औरंगाबाद: मराठवाड्यातील ३२ लाख दुष्काळी शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान वाटपाचे दोन टप्प्यांतील अनुदानाची रक्कम दिल्यानंतर आता नव्याने ७२२ कोटी रुपयांचा निधी मराठवाड्याला देण्यात आला आहे. आता विभागात दुष्काळी अनुदानाचे १ हजार ७७२ कोटी रुपये मिळाले आहेत.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर महिन्याभराने मराठवाड्याला ५२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५२५ कोटी रुपयांचा दुसरा तर आता २१ फेब्रुवारी रोजी विभागातील शेतकऱ्यांसाठी ७२२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रथम देण्यात आलेल्या एक हजार ५० कोटी रुपयांपैकी आतापर्यंत सुमारे ६३० कोटी रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले असून, आता नव्याने मिळालेल्या अनुदानाचे वितरणही संबंधित जिल्ह्यांना करण्यात आले आहे.

दुष्काळामुळे मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके करपली असून, ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. हे शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत होते, आता टप्प्याटप्प्यांने अनुदान वाटप होत असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या