शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
23 February 10:05

शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार


शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

कृषिकिंग, पुणे: मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेचा पहिला हप्ता उद्या (रविवार) शेतकऱ्यांना मिळणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत.

'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तीन टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील. केंद्र सरकारने या योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ डिसेंबर २०१८ अशा पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळेल.

याशिवाय, 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेपासून वंचित राहणाऱ्या राज्यातील उर्वरित सात लाख शेतकऱ्यांनाही लवकरच राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्रपणे योजना सुरु करणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ४ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक अनुदानासह विविध सवलती दिल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या